हाडांची ठिसुळता अचुकपणे दर्शविणारे अत्याधुनिक डेक्झा स्कॅन द्वारे हाडांची खनिज घनता मोजली जाते. या घनतेची तुलना एका तरुण व्यक्तिच्या हाडांच्या घनतेशी केली जाते. ही तुलना टी स्कोर म्हणुन दर्शवली जाते. रुग्णाच्या घनतेची तुलना समवयस्क व्यक्तिंच्या घनतेशी ही केली जाते. ती झेड स्कोर म्हणुन दर्शवली जाते. या माहितीवरुन डॉक्टरांना तुमचे कोणते हाड ठिसुळ झाले आहे व ऑस्टियोपोरोटिक फॅक्चर कुठे होऊ शकते हे वर्तविता येते.
डेक्झा स्कॅन डयुअल एनर्जी एक्सरे अब्झॉर्ब शियोमेट्री हे तंत्रज्ञान सुरक्षित, जलद, अचुक, वेदनारहित आणि कर्मरहित असुन ऑस्टियोपोरोसिसच्या निदानाकरिता अत्यंत उपयुक्त आहे. हाडांची खनिज घनता मोजण्यासाठी अन्य कोणत्याही पध्दतीपेक्षा हे तंत्रज्ञान सर्वोत्तम आहे. हयाचा रिपोर्ट संगणकाद्वारे पुर्णपणे इमेज व ग्राफिकद्वारे दर्शविला जातो. यामध्ये फक्त हाडांची घनताच नव्हे तर शरिरातील चरबी व मांसपेशीचे प्रमाणही दर्शविले जाते. हाडांची ठिसुळता फार आधीच जाणुन घेऊन पुढील दहा वर्षापर्यंत होऊ शकणार्या संभाव्य फॅक्चरचे अनुमान केले जाते.
याच बरोबर शरीरातील चरबीचे क्षेत्रीय वर्गीकरण डॉक्टरांना ह्रुदयरोगांची कल्पना देते.
त्यामुळे डेक्झा स्कॅनचा उपयोग आपल्याला खालीलप्रमाणे अनेक गोष्टींसाठी करता येतो.
ऑस्टियो म्हणजे हाड, ऑस्टियोपोरोसिस म्हणजे ठिसुळ झालेले हाड. वय वाढेल तसे हाडांच्या पातळ होत जाणार्या क्रियेला ऑस्टियोपोरोसिस म्हटले जाते. यामध्ये हाडे कमकुवत व नाजुक होत जातात, इतकी की एक हलकासा धक्काही त्यांना तोडु शकतो. २० वर्षे वयापर्यंत साधारण स्त्रियामध्ये ९८% अस्थिपुंज तयार झालेले असतात. ही प्रक्रिया वय वाढेल त्याप्रमाणे कमी होत जाते. ३५ ते ४० वयादरम्यान अस्थिपुंज कमी होऊ लागतात. पन्नाशीनंतर ते जास्त कमी होऊ लागतात. हे अस्थिपुंज कमी होण्याचे प्रमाण अधिक असेल तर ऑस्टियोपोरोसिस होऊ शकतो.
प्रारंभिक अवस्थेत ऑस्टियोपोरोसिस ओळखणे कठीण असते. अनेकांना हे माहित ही नसते की त्यांना ऑस्टियोपोरोसिस आहे. हा आजार हळूहळू आणि चोरुन चोरुन हाडांना क्षती करत राहतो. नेहमी वेदना नसतात किंवा कोणताही इशारा मिळत नाही, जोपर्यंत पहिले फॅक्चर होत नाही. त्यामुळे या आजाराला 'शांत चोर' असे म्हटले जाते. वॄध्दावस्थेमध्ये मणका, मणगट किंवा कमरेतील हाडांचे फॅक्चर ऑस्टियोपोरोसिस मुळे होऊ शकते.
कंबर, हात व मणगटाच्या हाडांमध्ये वेदना, पाठीच्या खालच्या बाजुला वेदना, उंची कमी होणे व बाक येणे, मानेमध्ये वेदना, कंबर, मणका व मनगटामध्ये फॅक्चर बहुतांशवेळा न पडता झडता होणे. ऑस्टियोपोरोसिस पुरुष आणि स्त्री दोन्हीमध्ये आढळणारी अवस्था आहे. पुरुषामध्ये ६५ ते ७० वर्षे वयानंतर हाडांची झीज जोराने होते. स्त्रीयांमध्ये रजो निवॄत्तीनंतर ४० ते ४५ वर्षे वया दरम्यान, जेव्हा ईस्ट्रोजन या हार्मोनचा स्तर कमी होऊ लागतो तेंव्हा हाडांची झीज सुरु होते. स्त्रीयांमध्ये ऑस्टियोपोरोसिसशी संबधातील फॅक्चर होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा चार पट अधिक आहे.
हा आजार होऊ न देणे हाच त्यावर सर्वोत्तम इलाज आहे, यासाठी विशेष इलाज नाही, पण अंस्थीपुंज व्यवस्थित ठेवले जाऊ शकतात व काही प्रमाणात वाढविलेही जाऊ शकतात. आपले डॉक्टरच हे ठरवु शकतात की कोणत्या प्रकारेस आपले अंस्थीपुंज वाढविता येतील किंवा फॅक्चर होण्याची शक्यता कमी करता येईल का? त्यामुळे ऑस्टियोपोरोसिस झाला आहे का? हे जाणुन घेणे महत्वाचे असते.
आधुनिक वैद्मकीय तंत्रज्ञानामुळे आज अनेक आजारांचे निदान वेळेत होऊ शकते. ज्या प्रमाणे हाडांचे फॅक्चर एक्सरेने ओळखले जाऊ शकते, तसेच हाडांची ठिसुळता व पुढे फॅक्चर होण्याची संभावना आज ओळखता येते.
हाडांच्या विकासासाठी आणि आयुष्यभर त्यांना बळकट राखण्यासाठी परिपुर्ण कॅल्शीयम व विटामीन-डी चे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे.
कोल्हापुरमध्ये डेक्झा स्कॅनव्दारे हाडांची घनता मोजुन त्यांची ठिसुळता जाणुन घेण्याची सोय फक्त कोल्हापुर इन्स्टिट्युट ऑफ ऑर्थोपेडिक्स ट्रोमा येथे उपलब्ध आहे.
For more information or to arrange your consultation, please use our online booking form or contact KIOT Hospital on +91-231-2650708 or via email, info@kiothospital.org